रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे भटक्या कुत्रयांचा उपद्रव वाढला आहे.

पागार कोळीवाडा नजीक बायपास रस्त्यावर भटक्या कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात  दोन सहा वर्षीय मुले जखमी झाली असून त्यांना अलिबाग येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रूद्र  आग्रावकर आणि अहमद कुन्गले अशी या जखमी मुलांची नावे आहेत. सायंकाळी रस्त्यावर खेळत असताना तेथून जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने दोघांवर हल्ला केला त्यात ते  जखमी झाले.

रेवदंड्यातील गल्ल्यांमधून फिरणारी भटकी कुत्री दुचाकी स्वारांचाही पाठलाग करतात, त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *