पुण्यात ATM मशीनला लागलेल्या आगीत पैसे जळून खाक

पुण्यातील सहकारनगर भागातील जनता सहकारी बँकेच्या ATM मशीनला शनिवारी सकाळी आग लागण्याची घटना घडली. या घटनेत सर्व पैसे जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अग्निशामन विभागाकडून व्यक्त करण्यात आली. अग्निशामन विभागाच्या आधिकायांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथील तुळशीबागवाले कॉलनीमधील जनता सहकारी बँकेच्या ATM मध्ये सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग एवढी भयानक होती की, काही क्षणात संपूर्ण ATM या आगीत जळून खाक झाले. त्यामुळे या एटीएममधील सर्व नोटाही आगीत भस्मसात झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *