कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खासगी बसला आग, दोघांचा मृत्यू

गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसच्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कळे पोलिसांनी तात्काळ जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

शुक्रवारी (24 नोव्हेंबर) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास लोंघे गावातील महादेव मंदिराजवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीनं दाखल झालं होतं व अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या घटनेत 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *