भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

भिवंडीत चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी वस्ती भागातील ही इमारत कोसळली आहे. या कोसळलेल्या इमारतीतून पाच नागरिकांना सुखरूप काढण्यात आलं आहे. तर पोलीस दल आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनस्थळी दाखल झाल्यात. अनेकजण इमारतीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारत कोसळल्याने एक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे तर अनेकजण जखमी झाल्याचं समजतं. तर १५ ते २० जण या इमारतीखाली दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ १० ते १२ वर्ष जुनी ही इमारत होती.

दरम्यान, मुंबईतील घाटकोपरमध्येही अशीच एक जुनी इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा अशी घटना घडल्याने इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *