नादुरूस्त ट्रक सुरू करण्याच्या प्रयत्नात स्वत:च्या ट्रकवरून पडून चालक ठार झाला. मुक्तदा निजाम (३०) रा. फतेपूर (बिहार) असे मृत वाहन चालकाचे नाव आहे.
ही घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ठाणा सुपर रोड उड्डाण पुलावर घडली. ठाणा उड्डाण पुलावर सुपर रोड स्थीत सदर ट्रक क्रमांक सी.जी. ०४ जेडी ५००८ हा नागपूरहून भंडाराकडे जात असताना नादुरूस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता.
सोमवारी सकाळला नागपूरहून भंडाºयाकडे जाणाºया ट्रकला नादुरूस्त ट्रकच्या चालकाने सहकार्य मागितले. यात ट्रक चालकाने दोन ट्रकच्यामध्ये लोंखडी रॉड (टॉमी) लावून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालक स्वत:च्या हातातील लोखंडी रॉड डोक्यावर आदळीत रस्त्याखाली पडला.
स्वत:च्याच ट्रकखाली जोराने आदळल्यामुळे गंभीर दुखापत झाली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. दुसºया ट्रक चालकाशी सहकार्य घेणाऱ्या ट्रक क्रमांक व चालकाचा पत्ता लागू शकला नाही. स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग माथनी टोल प्लॉझा येथील वाहनाद्वारे मृतदेह रूग्णालयात हलविला. जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहे. विशेष म्हणजे सर्व्हिस मार्गाचीही अवस्था वाईट असल्याने लहानमोठे अपघात घडत असतात.
