बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवर लष्कर बांधणार पूल

 गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बोपखेलगावच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.

लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिलं होतं. मात्र लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केलीय.

नव्या उड्डाणपूलाबाबत पत्र संरक्षण विभागाने पाठवलंय. त्यामुळे बोपखेलवासियांनी या नव्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *