सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव जाहीर त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर बंद ची हाक

सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी शिवा संघटनेने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्येही अनिकेत कोथळेच्या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश कामठेने केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी कुणालाही विश्वासात न घेता सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव जाहीर केले. त्याचा निषेध करण्यासाठी सोलापूर बंदीची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, यशवंत सेनेने सोलापूरकरांना हा बंद हाणून पाडण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर व सांगलीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून अनेक ठिकाणी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, सांगली पोलिस दलातील प्रकार अतिशय अशोभनीय आहे. या प्रकरणात दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगली पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या चौकशी मागणी होत असली तरी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाईचा निर्णय घेण्यात येईल’, असे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *