पार्किंगमध्ये भरधाव कारने आठ महिन्याच्या गर्भवती महिलेला चिरडलं

नोएडा येथील सेक्टर १८ मार्केट येथील पार्किंगमध्ये कार पार्क करणाऱ्या पार्किंग अटेंडंटने भरधाव कार चालवत आपल्या पतीबरोबर जात असलेल्या २६ वर्षीय गर्भवती महिलेला चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पार्किंग अटेंडंटला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक आणि मालती हे दाम्पत्य नोएडातील सेक्टर ७५ येथील केजेएस अरोमा सोसायटीत भाड्याने राहतात. रविवारी रात्री उशिरा नोएडातील सेक्टर १८ येथील एका शॉपिंग सेंटरमधील एका दुकानातून केक घेऊन पार्किंगमध्ये लावलेल्या कारकडे ते परतत होते. त्याचदरम्यान पार्किंगमध्ये कार पार्क करत असलेल्या पार्किंग अटेंडंटने भरधाव कार नेत पहिल्यांदा दोन कारला धडक दिली त्यानंतर पतीबरोबर जात असलेल्या मालती यांना चिरडले. त्यानंतर कार विजेच्या खांबाला जाऊन धडकली व जागेवरच थांबली. या अपघातात आठ महिन्यांची गर्भवती मालती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरीत नोएडातील कैलास रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अटेंडंट कार मागे घेत असताना निष्काळजीपणे भरधाव मागे होता. त्याचवेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि पहिल्यांदा त्याने दोन कारला धडक दिली. नंतर मालती यांना चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *