सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संसार धोक्यात!

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आता संसारही मोडू लागले आहेत. अशीच एक घटना शहरात उघडकीस आलेय. मात्र, पोलिसांनी संसार वाचविण्यासाठी याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहेत.
बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा दोन वर्षापूर्वी चेंबूरच्या तरुणासोबत विवाह झालाय. लग्न झाल्यावरही नवरा केवळ व्हॉटस्अॅपवर गुंतून असणं. संसारात लक्ष नसणं, यामुळे त्यांच्या संसारात खटके उडत आहेत.

दरम्यान, याचा पत्नीने जाब विचारताच नवऱ्याने पत्नीचा छळ करायला सुरुवात केली. फेब्रुवारी २०१५ ते जुलै २०१६ पर्यंत नवरा तिचा छळ करत होता, असे पत्नीने केलेल्या तक्रारीत म्हटलेय.

पतीच्या जाचाला कंटाळून अखेर तिने आर.सी.एफ. पोलीस ठाण्यात आपल्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस याबाबत सत्यता पड़ताळून तिच्या पतीविरोधात कारवाई करणार आहे, अशी माहिती देण्यात आलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *