सलमानने कतरिनाला किस करण्यास दिला नकार!

बॉलिवूड सिनेमांमध्ये आता किसींग सीन असणे साधारण बाब झाली आहे. अनेक बोल्ड सीन्सही अनेकदा बघायला मिळतात. अनेक मोठ्या स्टार्सनी सुद्धा किसींग सीन्स दिले आहेत.

पण सलमान खान असा एक अभिनेता आहे ज्याने अजूनही पडद्यावर किसींग सीन दिलेला नाहीये. ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. आणि त्याला पसंतीही मिळाली. यातील सलमान आणि कतरिनाची जोडीही पसंत केली जात आहे.

या सिनेमात दोघांना बघण्यासाठी त्यांचे आतुर उत्सुक झाले आहेत. दोघांची केमिस्ट्रीही सर्वांना आवडणारी ठरत आहे. पण याही सिनेमात सलमानने आपली नो किसींग पॉलिसी कायम ठेवली आहे. त्याने याही सिनेमात किसींग सीन करण्यास नकार दिलाय.

सलमान खान याने आजपर्यंत एकाही सिनेमात किसींग सीन दिला नाहीये. मीडिया रिपोर्टनुसार, ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातही सलमानने इंटिमेट सीन दरम्यान कतरिनाला किस करण्यास नकार दिला. खरंतर सर्वांना आशा होती की, सलमान आपली नो किसींग पॉलिसी तोडेल. पण तसे झाले नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने किसींग सीनसाठी सलमानला तयार करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. पण सलमानने स्पष्ट नकार दिली. त्यानंतर तो सीनच हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *