आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आरोपी परदेशी नागरिक

लग्नाचे अमिष दाखवून पवई (मुंबई) येथील एका ४२ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणा-या वेन स्मिथ (५२, रा. सॅलफोर्ड, मॅन्चेस्टर, यू. के.) या परदेशी नागरिकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आधी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयात खासगी तक्रार दिली. त्याच आधारे न्यायालयाने हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले.
तिच्यासोबत आॅगस्ट २०१५ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत लग्नाचे अमिष दाखवून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील एका इमारतीमध्ये आणि नेपाळ तसेच मँचेस्टर (इंग्लंड) आदी भागात वारंवार लैंगिक अत्याचार करून आर्थिक अडचण असल्याचे कारण दाखवून तिच्याकडून दोन लाख रुपये उकळले. त्यानंतर नेपाळ येथे फिरायला जाण्याच्या निमित्ताने त्याने तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. या प्रकारानंतर वेन हा आपल्या मायदेशात परतला. वारंवार संपर्क करूनही त्याने दाद न दिल्याने पिडीत महिलेने आधी कासारवडवली पोलीस ठाण्यात नंतर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्याआदेशानंतर कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *