पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं 5 गाड्यांना बसली धडक, विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

पुण्यामध्ये 5 वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली. यामध्ये बाईक आणि दोन चारचाकींचा समावेश होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अप्पर इंदिरा नगर परिसरातील ही दुर्घटना घडली आहे.  या अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *