सीमेवर देशाचं संरक्षण करणा-या जवानाच्या पत्नीचे 60 पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचं उघड

अमेरिकेतील एका लष्कर जवानाने आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आपल्या पत्नीचं 60 हून अधिक जणांसोबत अफेअर असल्याचा आरोप जवानाने केला आहे. आपल्या मित्राकडून आपल्याला ही माहिती मिळाल्याचं त्याने सांगितलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्यांच्यासोबत त्याच्या पत्नीचं अफेअर सुरु आहे त्यामधील अनेकजण लष्करातील जवानच आहेत. पतीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाआधी त्याच्या काही मित्रांनीच त्याची आणि पत्नीची भेट घडवून दिली होती. ज्यानंतर काही दिवसांनी लगेचच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नानंतर काही दिवसांनीच कामानितत्त जवानाला आपल्या पत्नीला सोडून जावं लागलं होतं. लग्नानंतर पत्नीसोबत जास्त वेळ घालवण्याची इच्छा असतानाही तो थांबू शकत नव्हता. मी देशाची सेवा करत असल्याने माझी पत्नी समजून घेईल असं मला वाटत होतं. तिला माझी आठवण येत असेल असं मला वाटत राहायचं. पण जेव्हा माझ्या मित्राने तिचं खरं रुप माझ्यासमोर उघड केलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.

मित्राने सांगितलं तेव्हा सुरुवातीला आपला त्याच्यावर विश्वासच बसला नाही असं जवानाने सांगितलं आहे. त्याने आपल्या कुटुंबियांसोबतही यासंबंधी चर्चा केली. जवानाची आई आजारी असल्याने तिला वारंवार डॉक्टरकडे जावं लागतं. घरातील इतर सदस्य कामानिमित्त एका शहरातून दुस-या शहरात प्रवास करत असतात. कुटुंबियांनीही तुझी पत्नी वारंवार घराबाहेर जात असते अशी माहिती जवानाला दिली.

यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. महिला सध्या गरोदर असून, हे मुल नक्की कोणाचं आहे यावरुन वाद सुरु आहे. जवानाच्या वकिलांनी, या मुलाचा वडील कोण आहे यासंबंधी माहिती मागितली आहे. जवानाने आरोप केला आहे की, पत्नीने फक्त आपला उपयोग करुन घेतला. तिने फक्त अन्न आणि निवा-यासाठी माझ्या घराचा वापर करुन घेतला. तिने आतापर्यंत 60 जणांसोबत अनैतिक संबंध ठेवले आहेत. जवानाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या घटनेवर भाष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *