पुण्यात दोन गटांत धुमश्चक्री, दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान

पुण्यात दोन गटांत धुमश्चक्री, दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान

किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीचा रुपांतर २ गटांतील धुमश्चक्रीची घटना पुण्यात घडलीय. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत शेकडो वाहनांचे नुकसान झालंय. यामध्ये ४ जण जखमी आहेत.

ण्यातील पर्वती दर्शन भागात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. आज सकाळपासून परिसरातील जनजीवन सुरळीत असलं तरी सामन्य नागरिकांमध्ये काहीसे भीतीचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *