मोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार

देशात रोजगार  निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

देशात रोजगाराची संधी नसल्याची टीका होत असलेल्या मोदी सरकाने रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कंबर कसली आहे. लवकरच मोदी सरकार केंद्र आणि राज्य स्तरावर २० लाख रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु करणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्रालय आणि सरकारी विभागांसोबतच पब्लिक सेक्टरमधील जवळपास २४४ कंपन्यांचा समावेश आहे. केवळ रेल्वेतच सुरक्षेसंबंधी २ लाख नोकर भरती केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

सरकारी विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि कुठल्या कार्यालयात आहेत यासंदर्भातील माहिती श्रम मंत्रालय गोळा करत आहे. ही माहिती गोळा केल्यानंतर एक प्लॅन केंद्र सरकारसमोर ठेवला जाईल आणि त्यानंतर नोकरी भरती सुरु करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *