दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर

दीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत  पुन्हा एकदा पावसाचा जोर  वाढलाय.. पहाटेपासून रिमझिम बरसणा-या पावसाचा जोर सकाळी मात्र वाढला.. अचानक सुरू झालेल्या पावसाने ऑफिसला जाणा-या मुंबईकरांची मात्र तारांबळ उडाली. तसंच अनेक ठिकाणी वाहतुकीचीही कोंडी झाली.

मुंबईत अनेक दिवसांपासून जोरदार पावसाने दडी मारली होती, मध्यंतरी काही ठिकाणी रिमझिम पाऊस होत होता, मात्र मुंबईचा जोरदार पाऊस काही आठवड्यापासून गायब होता.

मुंबईकरांच्या विकेन्डमध्ये आज पावसाने हजेरी दिली आहे. यामुळे मुंबईकर सुखावले तर आहेतच, पण महाराष्ट्रातही मान्सून स्थिरावू दे, पाण्याचा प्रश्न मिटू दे अशी अपेक्षा देखील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *