माळवी याचिकेवर आज होणार सुनावणी

माळवी याचिकेवर आज होणार सुनावणी

माजी महापौर तृप्ती माळवी यांनी नगरसेवक पद रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात दिलेल्या आव्हान याचिकेवर सोमवारी (६ जुलै) सुनावणी होत आहे. माळवी यांनी महापौर निवडीच्या कार्यक्रमाला स्थगिती मिळावी, अशी याचिका दाखल केली होती. माळवी यांच्या या​चिकेनुसार​ निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार देत सोमवारी महापौरपदासंदर्भात सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते.

त्याचवेळी महापौरपदासंदर्भात कोर्टाकडून दिला जाणारा आदेश हा चार जुलै रोजी महापौरपदाच्या निवडीसाठी बंधनकारक राहील, असे स्पष्ट म्हटले आहे. यामुळे हायकोर्टात सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्य सरकारने माळवी यांचे नगरसेवक व महापौरपद रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली डकरे यांची महापौरपदी निवड झाली आहे. माळवी यांच्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय काय लागतो यावरून महापालिकेतील पुढील राजकारण अवलंबून आहे. कोर्टाने माळवी यांची याचिका निकालात काढली तर नूतन महापौर डकरे यांचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, कोर्टाचा निकाल माळवी यांच्या बाजूने लागला तर त्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी हालचाली सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *