केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केलेल्या टीकेला शुक्रवारी उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारला हुकुमशहाचं सरकार असं म्हंटलं होतं. राहुल गांधींच्या यांच टीकेला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना या विषयावर बोलायला 42 वर्ष उशीर झाला आहे. हिटलरच्या विचारांनी कोण प्रेरीत आहे, ही गोष्ट इथे सांगायची गरज नाही. तसंच आणीबाणीची परिस्थिती कोणी निर्माण केली, लोकशाही भावना कोणी पायदळी तुडविली, हेही सगळ्यांना माहिती असल्याचं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. स्मृती इराणी यांनी ट्विट करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
राजा निर्वस्र आहे, पण सांगणार कोण अशा शब्दात राहुल गांधींनी शुक्रवारी मोदींवर हल्लाबोल केला होता. आज देशात भावनेच्या आधारावर लोकशाहीला बंदीस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम नोकरशहा, पंतप्रधान आणि संघाकडून करण्यात येत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. बंगळुरूत आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मोदी, भाजपा आणि संघावर निशाणा साधला. ते म्हणाले, “हिटलरने सांगितले होते. वास्तवावर पकड ठेवा, म्हणजे कधीही गडबड करता येईल. आज देशात हेच होत आहे. आज देशात भावनेच्या आधारावर लोकशाहीला बंदीस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे काम नोकरशहा, पंतप्रधान आणि संघाकडून करण्यात येत आहे’. राहुल गांधींच्या याच टीकेवर स्मृती इराणी यांनी टीका केली. या विषयावर बोलायला तुम्हाला 42 वर्ष उशीर झाला, असं स्मृती इराणी यांनी म्हंटलं आहे.
राहुल गांधी यांनी म्हंटलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हुकुमशहा आहेत. तसंच त्यांचे सहकारी त्यांच्या विरूद्धा आवाज उठवायला घाबरतात. मोदी एक असे हुकुमशहा आहेत. ज्यांचा खरा चेहरा सगळ्यांना माहिती आहे पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना काहीही बोलायती हिम्मद करत नाही. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरही स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहावा. काँग्रेसचं भविष्य अंधारात आहे या देशाचं नाही. असं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं. तसंच ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांनी धन्यवाद केलं. तुम्ही जे काही केलं त्यासाठी तुमचे भाजपाकडून आभार, असं इराणी म्हणाल्या आहेत.
गेल्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेला स्मृती इराणी यांनी उत्तर दिलं होतं. काश्मीरमधील समस्यांना संपूर्णपणे नेहरु आणि गांधी घराणं जबाबदार आहे, असं प्रत्युत्तर भाजपकडून राहुल गांधींना देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावण्यास वाव मिळाला, अशी टीका राहुल गांधी केली होती.
‘काश्मीरमधील आव्हानं नेहरु आणि गांधी घराण्यामुळे निर्माण झाली आहेत,’ अशी टीका करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी प्रत्युत्तर दिलं ‘काश्मीरमधील समस्या गांधी, नेहरु कुटुंबामुळे निर्माण झाल्या हे संपूर्ण देशाला माहित आहे,’ असंही इराणी यांनी म्हटलं. ‘सुट्टीवरुन परत आलेले राहुल गांधी दहशतवाद्यांबद्दल बोलण्याऐवजी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य करत आहेत. ज्यावेळी काँग्रेस नेते मनीशंकर अय्यर मोदी सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत होते, त्यामागे राहुल गांधींचा काही स्वार्थ होता का?, हा प्रश्न त्यांना विचारायला हवा,’ असं इराणी यांनी म्हटलं होतं.
