मुंबईत झाड अंगावर पडून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात शुक्रवारी नारळाचे झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू  झाला.  कांचन दास असे या महिलेचे नाव असून ती याच परिसरात राहणारी आहे.  कांचन दास चंद्रोद्य या सोसायटीच्या समोरील रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी या सोसायटीतील झाड अचानक त्यांच्या अंगावर कोसळले.
सकाळी कामावर जात असताना हे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. काही रहिवाशांनी त्यांना तत्काळ एक खासगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेला रुग्णालयात दाखल केले त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. अखेर आज सकाळी उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *