धनुष तोफेसाठी चिनी पार्ट्सचा पुरवठा, सीबीआयने सुरु केला तपास

बोफोर्स तोफांच्या धर्तीवर देशातच बनवण्यात आलेल्या 155 एमएम धनुष तोफेसंबंधी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. धनुष तोफांसाठी मेड इन जर्मनीच्या नावाखाली प्रत्यक्षात हलक्या दर्जाच्या चिनी पार्टसचा पुरवठा करण्यात आला आहे. सीबीआयने या प्रकरणी तपास सुरु केला असून, दिल्ली स्थित सिध सेल्स सिंडिकेट आणि जबलपूर येथील जीसीएफच्या अज्ञात अधिका-या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धनुष तोफेसाठी पाठवलेले चिनी पार्टस अत्यंत सुमार दर्जाचे आहेत. 1999 साली कारगिल युद्धाच्यावेळी लष्कराने बोफोर्स तोफांचा वापर केला होता. या तोफेच्या मारक क्षमतेमुळे त्यावेळी लष्कराला पाकिस्तानवर वर्चस्व मिळवता आले होते. त्यामुळे देशातच बोफोर्ससारखी तोफ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताच्या संरक्षण तयारीच्या दुष्टीने धनुष तोफेचे उत्पादन आणि कामगिरी अत्यंत महत्वाची असल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *