मोमोजमध्ये आढळलं कुत्र्याचं मांस; दिल्लीतील दुकानांवर कारवाई

तुम्हाला जर चिकन मोमोज खायला आवडत असतील तर आता तुन्हाला जरा सावध रहायला हवं. चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचं मांस असल्याचा तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. दिल्लीत चिकन मोमोजमध्ये कुत्र्याचे मांस आढळलं आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात दिल्लीतील २० दुकानं बंद करण्यात आली असून कँट परिसरातील आर्मी कँटीनमध्ये मोमोज विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दिल्लीच्या कँट बोर्डाला मोमोजमध्ये कुत्र्याचं मांस टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. विशेष करून कँट परिसरातील ७० वेंडिंग झोन आणि काही महत्त्वाच्या दुकानात मोमोजमधील चिकनमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे मोमोजचा दर्जा तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. दर्जा चांगला नसेल तर दुकानदाराचं सामान जप्त करून दुकानाला सिल ठोकण्याचे आदेश दिले होते, असं कॅ़ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेड्डी शंकर बाबू यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *