विक्रोळीतील पालिकेच्या रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे नर्सेस संपावर

महात्मा फुले महापालिका रुग्णालयातील नर्सेस संपावर  गेल्या आहेत. रुग्णालयाच्या दूरवस्थेमुळे या रुग्णालयातल्या 56 नर्सेसनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

रुग्णालयात स्लॅब कधीही कोसळेल अशी अवस्था झाली आहे. याबाबत वारंवार तक्रार करुनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसंच स्लॅबची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप करत नर्सेसनी हे संपाचं हत्यार उपसलं आहे. नर्सेसच्या या संपामुळे रुग्णांचे मात्र हाल होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *