पुलाचे कठडे तोडून कार नदी पात्रात कोसळली, कार मालक बेपत्ता

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे वर्धा नदीच्या पुलावरून कार कोसळून अपघात झालाय. दरम्यान या कारचे मालक मात्र बेपत्ता आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. वणी वरोरा मार्गावर वर्धा नदीवर पुलावरुन अन्वरुद्दीन ताबिश हे वणीच्या दिशेने येत होते. यावेळी पुलाचे कठडे तोडून कार नदी पात्रात कोसळली.

आज सकाळी पाण्यात तरंगतांना कार आढळल्यानंतर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. ही कार वणीच्या शास्त्री नगर येथील अन्वरुद्दीन ताबिश यांच्या मालकीची असून ते बेपत्ता आहेत. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली असून अनवरुद्दीन यांचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *