माहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू

माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

मृत्युमुखी पडलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव राजेश दिलीप गोकर्ण असल्याचं समजतंय. राजेश हा कल्याणमधील बेतूरकरपाड्याचा रहिवासी आहे.

आपल्या चार मित्रांसोबत राजेश माहुली परिसरात धबधब्याचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी आला होता. परंतु, अचानक ही दुर्घटना घडली आणि राजेशला आपला जीव गमवावा लागला. राजेशच्या मित्रांनाही याचा चांगलाच धक्का बसलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *