पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

पत्नीची हत्या करून घरात लपवला मृतदेह, पतीला अटक

उत्तर प्रदेशच्या मेरठ इथं एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीची हत्या केली आणि तीन दिवस घरातच तिचा मृतदेह ठेवला. जेव्हा पसरलेल्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला, तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी पतीला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोवामध्ये सोमेंद्र आपली पत्नी ज्योतीसोबत राहत होता. दोघांच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते. ज्योतीचं माहेर पश्चिम बंगालला होतं. सोमेंद्र दारूडा होता. नेहमी या पती-पत्नीत भांडणं व्हायची. तीन दिवसांपासून शेजाऱ्यांनी ज्योतीला पाहिलं नव्हतं. लोकांनी विचारलं तेव्हा सोमेंद्रनं ती माहेरी गेल्याचं सांगितलं.

शनिवारी शेजाऱ्यांना सोमेंद्रच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. धूर निघताच त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी मृतदेह हस्तगत केला आरोपी तेव्हा फरार झाला होता. आरोपी सोमेंद्रला गांवडी गावातून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *