साप महिलेला चावला आणि महिलाही सापाला चावली, दोघांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक महिलेला साप  चावला आणि त्यानंतर त्या महिलेनेही सापचा चावा घेतला यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने चावल्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला सांगितलं की तिनेही सापाला चावावं. त्यानंतर महिलेने तेच केलं त्यानंतर मात्र महिलेचा मृत्यू झाला.

५० वर्षांच्या रजंती देवी यांना साप चावला तेव्हा गावातील अनेक लोकांनी त्यांना पुन्हा सापाला चावायला सांगितंल. गावातल्या लोकांना सापाला पकडून देखील आणलं. रजंती यांनी सापाला चावलं त्यानंतर सापाचा तेथेच मरुन पावला. त्यानंतर महिलेची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण तो पर्यंत संपूर्ण शरिरात विष पसरलं होतं त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *