प.बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात

फेसबूकवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने बदुरिया आणि  नॉर्थ 24 परगणाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पण आता ही तणावसदृश्य परिस्थिती निवळायला सुरूवात झाली आहे. पण तेथिल इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे. फेसबूक पोस्टमुळे भडकलेल्या दंगलीनंतर सोमवारी सकाळपासून दुकानं, बाजार आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.  लोकांनी घराच्या बाहेर पडायला सुरूवात केली असून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे.  पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात कुठल्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडलेली नाही.

परिसरात गस्त घालण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. इथे परिस्थिती आता सुधारते आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती राज्याच्या गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *