मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ सिनेमाचा नुसता ट्रेलर रिलीज झाला, आणि वाद, चर्चेला सुरुवात झाली आहे. आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
जय निरुपम यांनी पत्रात लिहिलं आहे की, ‘भरत शाह दिग्दर्शित आणि मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. ट्रेलरनुसार चित्रपट आणीबाणीवर आधारित असल्याचं दिसत आहे. तसंच चित्रपटात आमचे लाडके नेते इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि उल्लेख असल्याचं पाहायला मिळालं’.