पोटच्या मुलांना जाळून मारणाऱ्या ‘त्या’ निर्दयी पित्याला अटक

पती पत्नीच्या वादात पोटच्या मुलांना बांधून जाळून मारणाऱ्या पित्याला पोलिसांनी बुधवारी अटक केली. कुंदन सुधाकर वानखेडे असे या निर्दयी आरोपीचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील टालेवाडी या ठिकाणी २१ जूनच्या रात्री ही वडिलांनी मुलांना पेटवून ठार मारल्याची घटना घडली होती. कुंदनने त्याची दोन मुले बलभीम व वैष्णव यांना राहत्या घरी बांधून पेटवून दिले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. या निर्दयी कृत्यानंतर आरोपी फरार झाला. आज सुधाकर टालेवाडी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी वडिलांनी अटक केली.

माजलगाव (जि. बीड) कौटुंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर आपल्या ताब्यात असणाऱ्या मुले पत्नीच्या ताब्यात मिळू नयेत, या हेतून त्याने मुलांना पेटवून मारले. निर्दयी बापाने घरातच गोवऱ्या रचून त्यावर मुलांना झोपवले व पेटवून दिले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून तो पसार झाला. कुंदन सुधाकर वानखेडे आणि पत्नी रेखा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्यांच्यातील वाद हा न्यायालयापर्यंत पोहोचला होता. न्यायालयीन तारिख दोन दिवसांवर आली असताना त्याने मुलांना जिवंत जाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *