छोटा राजनची पुन्हा एकदा हुलकावणी

छोटा राजनची पुन्हा एकदा हुलकावणी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पुन्हा एकदा आपला शत्रू छोटा राजनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दाऊदला हुलकावणी देण्यात छोटा राजन यशस्वी झाला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला दाऊदचा हस्तक छोटा शकीलने राजनच्या एका विश्वासू साथीदाराला फोडलं आणि त्यानंतर राजनला ऑस्ट्रेलियातच मारण्याची योजना आखली. मात्र, दाऊदचे शार्पशूटर मारण्यास येत असल्याची टीप मिळताच ऑस्ट्रेलियातील एका प्रांतातून राजन पसार झाला.

2000 सालीसुद्धा दाऊदच्या टोळीने छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये हल्ला केला होता. यात राजन गंभीर जखमी झाला होता. आताही हल्ला होण्याच्या आधीच राजन चकवा देण्यात यशस्वी ठरला आहे. भारतीय तपास यंत्रणांनेने मात्र यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *