पूँछमध्ये चकमक : महाराष्ट्रातल्या २ जवानांना वीरमरण

पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. संदीप सर्जेराव जाधव आणि सावन बालकू माने अशी या शहीदांची नावं आहेत. संदीप जाधव हे औरंगाबादचे आहे, तर सावन माने कोल्हापूरचे आहेत. या दोघा जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या गावावर शोककळा पसरली.

सावन माने हे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातले आहेत. त्यांचं पार्थिव शरीर आज दुपारी दिल्लीला आणि उद्या सकाळी त्यांच्या मूळ गावी पोहोचेल असं जिल्हाधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शाहूवाडी तालुक्यातल्या गोगवे गावावर शोककळा पसरली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *