रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली

रायगडकरांची मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. सोमवारी रात्री जिल्हयाच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. रात्री उशिरा अलिबागसह, श्रीवर्धन, मुरूड , म्हसळा , खालापूर या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला.

विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने  हवेत चांगलाच गारवा निर्माण झालाय . दोन तास बरसलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते . मात्र या पावसाने जिल्हयाच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हयात ढगाळ वातावरण होते  त्यामुळे पाऊस कधी सुरू होतोय याची प्रतिक्षा रायगडकरांना होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *