पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची सांमजस्याची भूमिका

शेतक-यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांब्यातल्या शेतक-यांनी सामजस्याची भूमिका घेतली आहे. आज सकाळी गावात झालेल्या बैठकीनंतर सरकारची चर्चेला तयार असल्याचं गावक-यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं आहे. कर्ममाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्याविषयी चर्चा करण्याची तयारी सरकारनं आधी दाखवलीय. पण अद्याप सरकारकडून कुठलही बोलावणं आलेलं नाही. तसं बोलावणं आलं तर चर्चेला तयार असल्याचं पुणतांब्यातल्या शेतक-यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी देखील अनेक शेतकाऱ्यांनी दूध फेकून दिलं होतं पण जिथे शेतकरी संपाची पहिली ठिंणगी पडली त्या पुणतांब्यातली जनतेने या दुधाची बासुंदी केली आहे. शेतकऱ्यांनी हे दुध फेकून ने देता त्याची बासुंदी किंवा खवा बनवला आहे. काहींनी तर दूध हे आजुबाजुला वाटून दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *