अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज बॉम्बस्फोटांनी हादरली. येथील भारतीय दूतावासापासून जवळच शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासातले अधिकारी, कर्मचारी सुरक्षित असून स्फोटामुळे केवळ दूतावासाच्या इमारतीच्या काचांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.
भारतीय दूतावासापासून १०० मीटरच्या अंतरावर हा बॉम्बस्फोट झाल्याने भारतीय दूतावासाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. स्फोटात ५० ते ६० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मृतांचा आकडा कळू शकला नाही. भारतीय दूतावासापासून दीड किलोमीटरवर असलेलं इराणचं दूतावास हल्लेखोरांचं लक्ष्य होतं, असं सांगितलं जात आहे.