जळगावात पाण्यात विष मिसळून तरुणाची आत्महत्या

पाण्याच्या ग्लासमध्ये विषारी पदार्थ मिसळून मिलिंद शालिक वानखेडे (वय 20, रा. मेहरुण, जळगाव) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली.औद्योगिक वसाहतमधील व्ही.सेक्टरजवळ असलेल्या एका दारुच्या अड्डय़ाजवळ मिलिंद बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
औद्योगिक वसाहतमधील व्ही.सेक्टरमधील ट्रायडन स्टील या कंपनीजवळ एक तरुण बेशुध्दावस्थेत असल्याची माहिती घेवून गणेश घ्यार नावाचा तरुण साडे सहा वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला आला होता. एमआयडीसी पोलिसांनी मिलिंद याला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पोलिसांनी सांगितले की, मिलिंद वानखेडे याचे एका तरुणीशी प्रेमप्रकरण होते. त्यातून संबंधित मुलीच्या भावाने व आतेभावाने त्याला तीन महिन्यापूर्वी मारहाण केली होती. तेव्हा एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *