बिहारमध्ये धावती बस पेटली, आठ जणांचा होरपळून मृत्यू

बिहारच्या नालंद्यामध्ये धावती बस पेटल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू  झाला आहे तर १२ प्रवासी जखमी झालेत.  नालंदा जिल्ह्यातल्या हरनौत बाजार येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास या बसनं पेट घेतला. थोड्याच वेळात आगीनं रौद्ररुप धारण केलं.

बसच्या इंजिनवर ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आले होते. इंजिन गरम झाल्यावर या ज्वलनशील पदार्थानं पेट घेतला आणि आग पसरली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. बाबा रथ ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीची ही बस होती. दरम्यान या आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा बिहार सरकारनं केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचारांचा खर्चही सरकार करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *