गणेश बोरसेने राजेश टोपेंच्या नावानेही अनेकाना गंडवलं

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीएस असल्याचं सांगत अनेकांना फसवणाऱ्या गणेश बोरसे प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. गणेश बोरसे या तोतयानं माजी तंत्रशिक्षण मंत्री राजेश यांच्या नावानेही अनेकांना फसवल्याची कबुली दिलीय.

या कामात त्याला दोघांची साथ मिळाली. बोरसेच्या या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार अजय उर्फ विक्की गवळीला बुलडाण्यातून तर गणेश पवारला कराडमधून ताब्यात घेतलं आहे.

राजेश टोपे यांच्या नावाने अडीच कोटी रुपये उकळल्याची कबुली त्याने औरंगाबाद पोलिसांसमोर चौकशी दरम्यान दिलीय. बोरसेच्या चौकशीत आणखी गुन्हे उजेडात येणार असल्याची माहिती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *