मान्सूनला पोषक वातावरण – कुलाबा वेधशाळेचा अंदाज

यंदाच्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरातला प्रवास सुकर होण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.

यंदा अंदमान निकोबार बेटांवर मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. येत्या ४८ तासात अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवला आहे.

पावसासोबत मान्सून बंगालच्या उपसागरात पुढे सरकारणार असल्याचंही वेधशाळेचं म्हणणं आहे. येत्या मे च्या शेवटापूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *