बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याचे गुप्तांग कापले

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ५४ वर्षांच्या व्यक्तीचे पीडित महिलेने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. जखमीला तिरुवअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी संशयित आरोपी तीन वर्षांपासून लैंगिक छळ करत होता, असा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

केरळमधील कोल्लम येथील आश्रमात हा संशयित आरोपी राहतो. तीन वर्षांपासून तो पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. शुक्रवारी पीडिता तिच्या कुटुंबीयांसह आश्रमात गेली होती. त्यावेळी संशयित आरोपीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारास पीडितेने विरोध केला. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘आरोपी गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. शुक्रवारीही त्याने बलात्काराचा प्रयत्न केला.” दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या आरोपीला तिरुवअनंतपुरम येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *