रस्त्यावर ऑइल सांडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुल ते खंडाळा बोगदा येथील ५०० मीटर रस्त्यावर टँकरमधील ऑइल सांडले आहे. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रस्त्यावरील ऑइल हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. वाहतूक थांबवण्यात आल्यामुळे वाहनांच्या सुमारे ४ ते ५ किमी दूरपर्यंत रांगा लागल्या आहेत. शनिवार सुटीचा दिवस असल्याने या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांची गर्दी असते. त्यातच ही घटना घडल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. उन्हाचा वाढलेला तडाखा त्यात वाहनांचा रांगा यामुळे प्रवासी त्रस्त झाले असल्याचे सांगण्यात येते. वाहतूक पूर्वपदावर यायला आणखी काही तास लागतील, असं समजते.
