३० मे ला मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चा

सकल मराठा क्रांती मोर्चाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. ३० मे   रोजी मुंबईतल्या आझाद मैदानापासून मंत्रालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोर्चातून मूक शब्द वगळण्यात आला आहे.

आरक्षणासह मराठा समाजाच्या इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चानंतर मराठा समाजाचे प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या बांधवांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गेल्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तकांमुळे तारखांचा घोळ झाला होता असा आरोप करत यावेळी तारीख बदलणार नसल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *