कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा जलवा

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. दीपिका पदुकोणनंतर आता ऐश्वर्या रायच्या लूकने कान्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकन्येसारखा निळया रंगाच्या ड्रेसमध्ये ऐश्वर्याचे सौदर्य अधिकच खुलून दिसत होते. रेड कार्पेटवर 43 वर्षीय ऐश्वर्याचा हा लूक टिपण्यासाठी कॅमेरामन्सची एकच धडपड सुरु होती.
कान्समधील ऐश्वर्याचे हे 16 वे वर्ष असून लॉरियल या ब्रँडची सदिच्छा दूत असल्याने तिला नेहमी आमंत्रित केले जाते. मागच्यावर्षी तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली. खासकरुन टि्वटरवर हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळी काहींनी तिच्यावर टीकाही केली होती.
कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन् सेक्सी दिसत होती. ड्रेससोबतचा तिचा स्मोकी डार्क मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालणारा होता. ज्वेलरी म्हणाल तर ड्रेसला मॅच इअररिंग्स व बोटात एक अंगठी एवढेच तिने घातले होते. कान्समध्ये संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *