राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर महिनाभराच्या आत दुस-यांदा अधिभार लावण्यात आलाय. पेट्रोल कंपन्यांनी कालच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. मात्र त्यानंतर लगेचच राज्य सरकारनं त्यावर अधिभार लावला. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत.
राज्यातल्या ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. विशेष म्हणजे २५ एप्रिललाच राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर ३ रूपये अधिभार लावला होता. आता तीन आठवड्यांत दुस-यांदा अधिभार लावण्यात आलाय.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या ग्राहकाला पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारनं मुद्रांक शुल्कात वाढ केल्यामुळं आता जमीन आणि घर खरेदी महागणार आहे.
या निर्णय़ावर विरोधकांनी टीका केलीय. दारू न पिणा-यांवर अधिभार लावून सरकारनं अन्याय केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केलाय.