अनैसर्गिक संबंधांसाठी जबरदस्ती, पतीविरोधात पत्नीने दाखल केली तक्रार

अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करणा-या पती विरोधात पत्नीनेच पोलीसात रीतसर तक्रार  दाखल केली आहे. पीडित महिला आग्रा इथे राहते. पीडित महिला सधन कुटुंबातील असून तिच्या पतीचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. पतीने आपल्यावर ग्रुप सेक्ससाठी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे. पीडिता महिला 35 वर्षांची असून तिला दोन मुले आहेत.
मागच्या महिन्यात ही घटना घडली पण तिने रविवारी संध्याकाळी एफआयआर दाखल केला. मद्याच्या नशेत पतीने आपल्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले असा आरोपही या महिलेने केला आहे. 2003 साली या महिलेचे लग्न झाले आहे. व्हॉटसअॅपवर पती मला अश्लील न्यूड फोटो पाठवतो. त्याने माझेही विवस्त्र फोटो काढले असून, सोशल मीडियावर ते फोटो अपलोड करण्याची मला सतत धमकी देत असतो असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
त्याचे त्रास देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले होते. माझ्याबरोबर अनैसर्गिक संबंध ठेवल्यानंतर दोन दिवसांनी पती मला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या दोन नातेवाईकांना बोलवले व त्यांच्यासमोर माझ्यावर जबरदस्ती सुरु केली. त्यानंतर तिघांनी माझ्यावर जबरदस्तीचा सुरु केली पण कशीबशी मी माझी हॉटेलरुममधून सुटका केली आणि तिथून निसटली.
त्यानंतर हॉटेलच्या स्टाफचा फोन घेऊन माझ्या भावाला फोन केला आणि त्याला सर्व प्रकार सांगितला असे पीडित महिलेने म्हटले आहे. हॉटेलमध्ये माझ्याबरोबर जो प्रकार झाला त्यामध्ये मला दुखापत झाल्याने मी रुग्णालयात अॅडमिट होते. मी हॉस्पिटलमध्ये असताना पती तिथे आला. त्याने मला घडल्या प्रकाराची कोणाजवळ वाच्यता केली तर,  माझे फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी दिली. महिलेच्या जबानीवरुन पोलिसांनी पतीसह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तिघेही फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *