रिक्षेच्या धडकेत हरणाचा मृत्यू, रिक्षाचालकही जखमी

 

  मुंबईतील गोरेगाव परिसरात  गुरुवार (11 मे) रात्री एक रिक्षेची हरिणाला धडक बसली. या विचित्र अपघातात हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

 रिक्षा आणि हरणामधील ही धडक इतकी भीषण होती की अपघातात रिक्षादेखील पूर्णतः उलटली. या दुर्घटनेत रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळापासून जवळच बोरीवली नॅशनल पार्क आहे. उकाड्यामुळे पाण्याच्या शोधात हे हरिण जंगलाबाहेर आले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *