बाहुबली लवकरच गाठणार १५०० कोटींचा पल्ला

28 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या बाहुबली  2 ने तिकीट खिडकीवरचा आपला करिष्मा कायम ठेवलाय. बाहुबली टू ने तब्बल 1 हजार कोटींचा बिझिनेस करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केलाय.

बाहुबली टू 1 हजार कोटींचा बिझिनेस करणारी पहिली भारतीय फिल्म ठरलीये. केवळ 9 दिवसांत या फिल्मने हा टप्पा पार केलाय. बाहुबलीचा तिकिट खिडकीवरचा कमाईचा हा वेग पाहता आता लवकरच  1500 कोटींचा आकडा पार करणं बाहुबलीला अशक्य नसल्याचंचं चित्र दिसतंय.

भारताबरोबरच परदेशातही बाहुबली टूचा जलवा कायम आहे. एकूणच बाहुबलीने याआधी बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड केलेल्या दंगल, पीके, सुल्तान, बजरंगी भाईजान अशा अनेक फिल्म्सना मागे टाकत हा नवा इतिहास रचलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *