सुनील नरिने आणि ख्रिस लिनच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर केकेआरने आरसीबीला ६ विकेट राखून हरवले. या विजयासह केकेआर पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलीये.
सुनील नरिनेने १७ चेंडूत ५४ धावा तर लिनने २२ चेंडूत ५० धावा तडकावल्या. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांतच या दोन्ही फलंदाजांनी मिळून १०५ धावा ठोकल्या. आयपीएलमध्ये पॉवरप्लेमधील षटकांत झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी २०१४मध्ये चेन्नईच्या संघाने पंजाबविरुद्ध खेळताना पॉवरप्लेमध्ये १०० धावा केल्या होत्या.
