तुरीनंतर हळद गडगडली!

जिल्ह्यात नाफेडच्या तूर खरेदीच्या वादानंतर आता मार्केट यार्डात मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी आणलेल्या हळदीचे भाव पडल्याने शेतकरी वर्ग चांगलाच संकटात सापडला आहे. ३ मे रोजी िहगोलीत पावसाच्या सरी पडल्याने शेतकऱ्याची हळद भिजली. हेच कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव एका दिवसात एक हजार रुपयांनी पाडल्याने काही वेळ शेतकरी व व्यापाऱ्यात वादाची ठिणगी पडली. माल मोठय़ा प्रमाणात आल्याने वजनकाटा करण्यासाठी दोन दिवस चक्क खरेदी बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचा मुक्काम झाला.

नाफेडच्या तूर खरेदीचे वादळ अद्याप संपलेले नसताना िहगोलीच्या मार्केट यार्डात हळद मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत. ३ मे रोजी सुमारे १० हजार िक्वटलच्या वर हळद विक्रीसाठी आली होती. त्यातच सायंकाळी पावसाच्या सरीने हजेरी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांची हळद भिजली. परिणामी, भिजलेला माल कमी भावात जात असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यासोबत वाद घातला. बुधवारपेक्षा गुरुवारी हळदीचा भाव १ हजाराने कमी केल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि वजनकाटे बंद पाडले. इतरत्र हळदीला ५ हजारापेक्षा अधिक भाव असताना िहगोलीत ४ हजार २०० भाव का ? असा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.

मार्केट यार्डात हळदीची आवक मोठय़ा प्रमाणात झाल्याने माल ठेवण्यास जागा कमी पडत होती. त्यातच कमी भावाचा वाद सुरू झाल्याने बाजार समितीने गुरुवारी व शुक्रवारी हळद खरेदी बंद ठेवली. याबाबत बाजार समितीच्या सचिवाशी संपर्क साधला असता आधीच मोठय़ा प्रमाणात आलेल्या मालाचा वजनकाटा करून घेणे याला आम्ही प्रथम प्राधान्य दिले. पहिल्याच मालाचा वजनकाटा न झाल्याने परत आलेला माल व त्यातून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी गुरुवारी, शुक्रवारी हळद खरेदी बंद ठेवल्याचे पटेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *