पुण्यात शुक्रवारपेठेतल्या जुन्या वाड्याला आग, एकाचा मृत्यू

पुण्यात शुक्रवारपेठेतल्या एका जुन्या वाड्याला आग लागली…रात्री झालेल्या या दुर्घटनेत आग एका नागरिकाचा मृत्यू झालाय. तर अग्निशमन दलाचे 4 जवान जखमी झालेत.

खरंतरं मध्यरात्री लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या…दोन तासांच्या परिश्रमांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

पण या दरम्यान बाजूच्या वाड्यालाही आग लागली. त्यातच वाड्याची भिंत पडली आणि त्यात अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झालेत.. या दुर्घटनेवेळी एक रहिवासी जखमी झाला. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *