पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोलचे भाव एक पैशांनी तर डिझेलचे भाव ४४ पैशांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

याआधी १ एप्रिलला पेट्रोल ३.७७ रुपये तर डिझेल २.९१ रुपयांनी स्वस्त झालं होतं. पण राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार वाढवल्यानं पेट्रोल तीन रुपयांनी महागलं.

दरम्यान उद्यापासून देशातल्या पाच शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर ठरणार आहेत. चंदीगड, उदयपूर, जमशेदपूर, पाँडेचेरी आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर ठरतील. या पाच शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *